शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे, रात्री थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:41 IST

मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे.

नाशिक : मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तापमान मात्र २५ अंशांवरून तिशीपार सरकल्याने सूर्योदय होताच थंडीपासून नागरिकांना दिवसभर काहीसा दिलासा मिळत आहे.पंधरवड्यापासून शहरात थंडीची तीव्रता कमालीची वाढली आहे. यावर्षी हंगामातील किमान तापमान नीचांकी ५.१ अंशांपर्यंत खाली आले होते. तसेच कमाल तापमान देखील २३ अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहा अंशांच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे.उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान घसरले आहे. सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने जॉगिंग ट्रॅक, जिममध्ये जाणाºयांची संख्या कमी झाली आहे.काही दिवसांपूर्वी शहरात वाहणाºया थंड वाºयाचा वेग ताशी दहा किलोमीटर असा होता; मात्र दोन दिवसांपासून वाºयाचा वेग मंदावल्याने कमाल तापमान वाढू लागले आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिवसभर वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवडा दिवसभर उबदार कपडे परिधान करणाºया नाशिककरांकडून सध्या सकाळ-संध्याकाळ उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य देत आहेत. यंदा डिसेंबरअखेर थंडीचा प्रचंड कडाका नागरिकांना अनुभवयास आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गेल्या आठवड्यात नाशिक हे राज्यातील सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले होते. शहरात नीचांकी ५ अंशांपर्यंत पारा घसरला होता.—इन्फो—रविवारपासून पुन्हा थंडीची लाटपंधरवड्यापासून थंडीच्या लाटेचा सामना करणाºया उत्तर महाराष्टÑातील विशेषत: नाशिककरांना दोन दिवसांपासून थंडीच्या क डाक्यापासून अंशत: दिलासा मिळाला आहे; मात्र रविवारपासून सोमवारपर्यंत दोन दिवस थंडीची लाट उत्तर व मध्य महाराष्टÑात येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिला आहे. काश्मीर खोºयात शुक्रवारपासून सलग बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिक