शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

८०हून अधिक अ‍ॅप साठविणारे ‘डीग मी अप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:45 IST

सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकले आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अ‍ॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ नावाच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये साठविण्याचा नवा पर्याय शोधला आहे.

ठळक मुद्देदोघांचे यश ; एकाच अ‍ॅप्लिकेशनमध्ये सर्वकाही

नाशिक : सॉफ्टवेअर अभियंता होऊन जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी परतणाऱ्या नाशिकच्या सोहम गरुड व देवयानी लाटे या दाम्पत्याने सोशल नेटवर्किंगमध्ये पाऊल टाकले आहे. ८०पेक्षा अधिक ग्राहक फ्रेन्डली अ‍ॅप्लिकेशनला एकाच ‘डीग मी अप’ नावाच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये साठविण्याचा नवा पर्याय शोधला आहे. ‘डीग मी अप’ या नव्या अ‍ॅप्लिकेशनच्या नावाचा अर्थ ‘मला शोधून काढा’ असा होतो. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये एकापेक्षा अधिक अ‍ॅप्लिकेशन नेटवर्क जोडून सर्वच सोशल साइट्स वापरता येऊ शकतात, असा दावा सोहम व देवयानी यांनी पत्रकार परिषदेत केला.स्मार्ट फोनच्या दुनियेत विविध प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध झाले असून, अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड करताना साठवणूक क्षमतेचा विचार करावा लागतो. त्यामुळे या युवा जोडीने त्याच्यावर तोडगा काढत आपले ज्ञान व कौशल्याच्या आधारे ‘डीग मी अप’ नावाचे एक स्वतंत्र अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, जी मेल, इन्स्टाग्राम यांसारखे आपल्याला हवे असलेले सुमारे ८० अ‍ॅप्लिकेशन सहजरीत्या जोडून ते वापरता येणे शक्य असल्याचा दावा सोहम व देवयानी यांनी यावेळी बोलताना केला. हे अ‍ॅप्लिकेशन प्ले-स्टोअरवरून अगदी मोफत डाउनलोड करता येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या नवीन माहिती तंत्रज्ञानातील शोधाबाबत ‘डीग मी अप’ नावाने आंतरराष्टÑीय पेटंट मिळविण्यासाठी अर्जही केल्याचे सोहमने सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीtechnologyतंत्रज्ञान