शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या 72 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:33 IST

दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणीएक हजार 32 नोंदणीकृत शाळांमध्ये परीक्षा

नाशिक : करिअरमधील महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या वर्गाकडे पाहिले जाते. अशा दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण ११०८ शाळांपैकी सुमारे १०३२ शाळांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ८९ हजार ३२६ विद्यार्थ्यांपैकी ७२ हजार ७९२५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत परीक्षा दिली आहे. अजूनही अनेक काही शाळांनी विद्यार्थ्यांची चाचणी घेतलेली नाही, अशा शाळांनी तत्काळ कलमापन व अभिक्षमता चाचणी पूर्ण करण्याच्या सूचना नाशिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्हातील शाळांना केल्या आहेत. जिल्हाभरातील विविध शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची २९ डिसेंबर २०१९ पासून कलमापन व अभिक्षमता चाचणीला सुरुवात झाली असून, महाकरिअर मित्र अ‍ॅपद्वारे आॅनलाइन घेतली जाणारी ही चाचणी १८ जानेवारी २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. कलचाचणी मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी ‘महाकरिअर मित्र’ अ‍ॅप सुरू करण्यात आले असून,  चाचणी परीक्षेसाठी गुगल प्लेस्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइल अ‍ॅपद्वारे कलचाचणी देता येणार नाही, त्यांना संगणकाच्या मदतीनेही कलचाचणी देता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून, या परीक्षांच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी कलचाचणीची मदत होते. यात कलचाचणीद्वारे कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आदी क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा असलेला कल जाणून घेतला जातो, तर अभिक्षमता चाचणीद्वारे भाषिक, तार्किक, अवकाशीय, सांख्यिकीय अशा चार क्षमतांची चाचणी घेण्यात येणार असल्याचे विभाग समन्वयक डॉ. बाबासाहेब बडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थी