पेठ तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:09 AM2021-11-09T00:09:44+5:302021-11-09T00:10:27+5:30

पेठ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या किमान सुविधाही उपलब्ध होऊ न शकल्याने पेठ तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. ८) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

Morcha of Shramjivi Sanghatana at Peth Tehsil Office | पेठ तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

श्रमजीवी संघटनेच्यावतीने पेठ तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा.

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदार संदीप भोसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पेठ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या किमान सुविधाही उपलब्ध होऊ न शकल्याने पेठ तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. ८) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल योजना, वनजमिनी यासह आरोग्य, शिक्षण व पाणी आदी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी पेठ शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय आवारात नेण्यात आला. तहसीलदार संदीप भोसले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाडेकर, सचिव धनराज जाधव, पांडू शेवरे, लक्ष्मण शेवरे,सु नील कुवर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

Web Title: Morcha of Shramjivi Sanghatana at Peth Tehsil Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.