शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:28 IST

महापालिकेच्या मोरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, याठिकाणी अंत्यविधी करण्यात येणाऱ्या मृतदेहाची अंत्यसंस्कारानंतर अवहेलना होत असल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

सिडको : महापालिकेच्या मोरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, याठिकाणी अंत्यविधी करण्यात येणाऱ्या मृतदेहाची अंत्यसंस्कारानंतर अवहेलना होत असल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. अंत्यसंस्कार केल्यानंतर मृताचे नातेवाईक निघून गेल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे चितेजवळ परिसरातील काही मोकाट कुत्रे जाऊन त्या मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. सदर प्रकार थांबवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे.महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे वैकुंठधाम मोरवाडी या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अंत्यविधीसाठी अमरधाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनपाने ठेकेदाराची नियुक्ती केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदाराकडे याचे कामकाज देण्यात आल्याने ठेकेदार मनपा अधिकारी अथवा नगरसेवक यांना जुमानत नसल्याचे चित्र बघायास मिळत आहे. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने अंत्यविधी करण्यासाठी येणाºयांना पुरेसे लाकूड तसेच अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य देणे बंधनकारक असताना यात अनेकदा रॉकेल शिल्लक नसते तर काहीवेळा इतर साहित्याचीदेखील कमतरता असते. स्मशानभूमीतील लाकडे उघड्यावर पडलेली असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने लाकूड हे ओले होत आहे. त्याचाच वापर अंत्यविधीसाठी केला जातो, त्यामुळे मृतदेह अर्धवट जळतो.  मृतदेह हा पूर्णपणे जळाला का नाही हे बघणे संबंधित ठेकेदाराचे काम असताना त्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष केले जात असल्याने मोकाट कुत्रे तेथे येऊन चितेवर ठेवलल्या मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती महापालिका तसेच नगरसेवकांना दिल्यावर धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून मनपा आरोग्य विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, नाना जगताप, रवि जाधव, गोविंद घुगे, भूषण राणे आदींनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली.दुर्लक्ष : नागरिकांची नाराजीमोरवाडी स्मशानभूमीतील या गंभीर प्रकाराबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांनी तक्रार केल्यामुळे आता महापालिका प्रशासन ठेकेदाराबाबत काय भूमिका घेते, शिवाय मोकाट कुत्र्यांचा स्मशानभूमीतील वावराबाबत काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. अत्यंत संवेदनशील व भावनेशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक