आक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:42 PM2021-03-31T23:42:10+5:302021-04-01T00:57:40+5:30

नाशिक: जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे.

Monitoring officer appointed to ensure smooth supply of oxygen | आक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी नियुक्त

आक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी नियुक्त

Next
ठळक मुद्देसंनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास

नाशिक: जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व बाबींचे समन्वय करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास हे संपूर्ण जिल्ह्याकरिता संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.

अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी श्रीवास ऑक्सिजनची माहिती संकलनाबरोबरच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन सर्व रुग्णालयांना तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसारच ऑक्सिजनचा वापर होतो किंवा नाही, याची खात्री करणार आहेत. आक्सिजन वाया जाणार नाही, याबाबत दक्षता, जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णास ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत.

Web Title: Monitoring officer appointed to ensure smooth supply of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.