शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडीच्या अवयव विक्रीचा डाव नाशकात उधळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 19:21 IST

धनप्राप्तीसारख्या अंधश्रद्धेपोटी घोरपड या वन्यजीवाचा बळी आजही दिला जात असून ही दुर्दैवी बाब आहे. तांत्रिक-मांत्रिकांच्या भोंदूगिरीमुळे घोरपडसारख्या विविध वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे

ठळक मुद्देजप्त केलेले अवयव वनविभाग प्रयोगशाळेत पाठविणारद्वारका चौकात सापळा अंधश्रद्धेपोटी घोरपडीचा बळी

नाशिक : घोरपड या वन्यजीवाच्या अवयवांच्या विक्रीच्या उद्देशाने द्वारका चौकात आलेल्या त्र्यंबकेश्वरच्या इसमास नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली होती. सोमवारी (दि. २८) वनविभागाच्या पथकाने संशयित धर्मा पवार (२४, रा. त्र्यंबकेश्वर) यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.

वन्यजीवांचे काही अवयव घेऊन एक संशयित व्यक्ती नाशिकच्या द्वारका भागात विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मुंबई येथील वन्यजीव गुन्हे ब्युरो कार्यालयाने नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांना दिली होती. या माहितीवरून गर्ग यांच्या आदेशान्वये वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने द्वारका येथील भुयारी मार्गाजवळ शुक्रवारी सापळा रचला. संशयित धर्मा हा हातात एक पिशवी घेऊन सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आल्याने पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पिशवीतील प्लॅस्टिकच्या डब्यात घोरपडसारख्या अनुसूची-१ मधील संरक्षित वन्यप्राण्याचे काही अवयव आढळून आले. त्यास मुद्देमालासह पथकाने पश्चिम वनविभागाच्या कार्यालयात आणले. जप्त केलेले अवयव हे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे भदाणे यांनी सांगितले. धर्मा यास न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली होती. सोमवारी वनकोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या वेळी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन जामीन मंजूर करण्यात आला....तर सात वर्षांचा होऊ शकतो कारावासवन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये घोरपडीचा समावेश करण्यात आला आहे. अशा वन्यजीवांची त्यांच्या अवयवांसाठी अथवा अन्य कोणत्याही उद्देशाने शिकार करणे गंभीर गुन्हा आहे. या प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला सात वर्षांचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड अथवा दोन्ही प्रकारची शिक्षा गुन्ह्याचे स्वरूप बघता न्यायालयाकडून सुनावली जाऊ शकते.--

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागArrestअटक