शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

संततधार पावसाने सोमवार पाण्यात

By admin | Updated: July 28, 2015 01:02 IST

संततधार पावसाने सोमवार पाण्यात

नाशिक : रविवारी दुपारनंतर शहरात अधून-मधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारीही सकाळपासून मुक्काम कायम ठेवत नोकरदारांनी सार्वजनिक सुट्टी घरातच घालविली. परिणामी त्याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम दिसून आला. मात्र जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची ‘वाट’लागली.गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी दुपारनंतर हजेरी लावली. जोराचा कोसळत नसला तरी, अधून-मधून येणाऱ्या सरींनी काहीसे जनजीवन बाधित झाले, त्यामुळे रविवारची सार्वजनिक सुटी नागरिकांना छत्री, रेनकोट बरोबर घेऊनच घालवावी लागली. मात्र रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला. पहाटेपर्यंत धो-धो कोसळून काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळी दहा वाजेपासून पुन्हा एकवार हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नोकरी, धंद्यानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घ्यावा लागला. सोमवारी राज्य सरकारची शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सार्वजनिक सुटी असल्याने त्यांची सुटी पाण्यात गेली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता वाहतुकीवरही परिणाम झाला. एरव्ही वाहनांच्या वर्दळीने गजबजणारे रस्ते काही प्रमाणात शुकशुकाट होते, तर साधुग्राममध्येही भाविकांची संख्या रोडावली होती. पावसामुळे आषाढी एकादशीनिमित्त देव-दर्शनाला जाऊ पाहणाऱ्या भाविकांनाही मुरड घालावी लागली. सायंकाळीही पावसाने हजेरी कायम ठेवल्यामुळे त्याचा व्यवसाय व व्यापारावरही परिणाम झाला. दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळल्याने रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून, काही रस्त्यांची चाळणही झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागली. येत्या चोवीस तासात पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.