शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आठवडाभरात दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:45 IST

गेल्या बुधवारी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका पित्याने अशाच पद्धतीने रात्री घरात सगळे झोपलेले असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्दे(पोस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखलअन्यथा जिवे ठार मारील’, अशी धमकीही दिली

नाशिक : ज्या पित्याने जन्माला घातले त्याचीच आपल्या लहानग्या बालिकेवर वक्रदृष्टी व्हावी आणि त्याने पोटच्या मुलीची अब्रू धोक्यात आणावी, अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना या आठवड्यात घडल्या आहेत. पेठरोडवरील फुलेनगर भागात एका ४५ वर्षीय पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.गेल्या बुधवारी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका पित्याने अशाच पद्धतीने रात्री घरात सगळे झोपलेले असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेत म्हसरूळ पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ बापाला अटक केली आहे. ही घटना ताजी असताना पुन्हा पंचवटी भागात पेठरोडवर अशीच दुसरी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फुलेनगर परिसरात गेल्या गुरु वारी रात्री फिर्यादी पीडित मुलगी ही आपले आई-वडील तसेच भावासह घरात झोपलेली असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पित्याने मुलीच्या शरीराशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत याबाबत ‘आईला सांगू नको, अन्यथा जिवे ठार मारील’, अशी धमकीही दिली. दुस-या दिवशी सकाळी पीडित मुलीने रात्री घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर पीडितेला सोबत घेऊन नातेवाइकांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात घडलेला सगळा प्रकार सांगत संशयित पित्याविरुद्ध फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेनंतर फरार झालेल्या संशयित बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंगnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय