शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

अल्पवयीन शाळकरी मुलीचा दोन महिन्यांपासून पाठलाग करून त्रास देत तिच्या आईच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या युवकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ जगदीश प्रकाश कठरे (२०, रा़ कडवेनगर, नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़

इंदिरानगर : अल्पवयीन शाळकरी मुलीचा दोन महिन्यांपासून पाठलाग करून त्रास देत तिच्या आईच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या युवकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ जगदीश प्रकाश कठरे (२०, रा़ कडवेनगर, नाशिक) असे या संशयिताचे नाव आहे़ पाथर्डी फाटा परिसरात राहणाºया शाळकरी मुलीचा संशयित कठरे हा १ आॅक्टोबरपासून पाठलाग करीत होता़ पीडित मुलगी सायंकाळी खासगी शिकवणीहून परतत असताना संशयिताने तिला रस्त्यात अडवून तिचा हात धरून विनयभंग केला़ तसेच या मुलीच्या आईच्या मोबाइलवर अश्लील संदेश पाठवून त्रास दिला़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित कठरे याच्या विरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मद्यपीचे प्रवाशासोबत गैरवर्तनमद्यसेवन करून मला पाहिजे त्याच सीटवर बसणार असे म्हणून सहप्रवाशांसोबत वाद घालून गैरवर्तन करणाºया तरुणाविरोधात सरकारवाडा पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ मयूर कासार (२९, रा़ मु़ वासाळी, पो़ त्र्यंबक विद्यामंदिर, त्र्यंबकेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.२३) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये संशयित मयूर कासार हा मद्यसेवन करून आला. यानंतर मला हव्या त्या सीटवर बसू द्या असे म्हणून इतर प्रवाशांसोबत हुज्जत घालून गैरवर्तन केले़ तसेच बस नियोजित वेळेत स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही.क्रांतीनगरमध्ये नायलॉन मांजा जप्तविक्रीसाठी बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाºया पंचवटीतील क्रांतीनगरमधील संशयित शुभम बोडके (२२, रा. क्रांतीनगर) याच्या विरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ त्याच्याकडून नायलॉन मांजाचा एक गठ्ठाही जप्त करण्यात आला आहे़मारहाण प्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना अटकरिक्षाचालकाने पादचारी इसमास कट मारून खाली पाडून् शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना जुना गंगापूर नाका येथे घडली़ चंद्रशेखर राठोड (रा. राका कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित रिक्षाचालक संदीप झनकर (एमएच १५, झेड ३५३२) याने कट मारून खाली पाडले. तर त्याचा जोडीदार स्वप्नील खोडे (दोघेही रा. मल्हारखाण झोपडपट्टी, नाशिक) याने शिवीगाळ केली. या दोघांना शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता या दोघांनी राठोड यांना फायटरने मारहाण केली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक केली आहे.वाहतूक पोलिसाला धक्काबुक्कीविनाहेल्मेट दुचाकी चालविल्याने दंड आकारल्याचा राग आल्याने संशयित सागर किशोर बडगुजर (२९, रा. लक्ष्मीनगर, अमृतधाम, पंचवटी) याने वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी संतोष नवले यांना धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथे घडली. या प्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात बडगुजर विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी