शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला एटीएमवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:39 IST

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे२० गुंड अटकेत : अकरा महिन्यांत ३२ सराईत गुन्हेगारांभोवती पोलिसांनी आवळला फास

नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे. चालू वर्षात एकू ण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी २० गुंड पोलिसांच्या हाती लागले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरोड्याच्या गुन्ह्यात गजानन मोतीराम कोळी, मिलनसिंग रामसिंग भादा या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून त्याच रात्री ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. कि स्मतसिंग रामसिंग भादा (२०), तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०), रामसिंग राजूसिंग जुन्नी (२५), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५, सर्व रा. मोहाडी, जि.धुळे) या संशयितांची नावे दरोड्यात निष्पन्न झाली. या सहा सराईत दरोडेखोरांनी मिळून पालघर, ठाणे, डहाणू जिल्ह्यांत घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या हाती लागलेला मिलनसिंगविरुद्ध १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, गजाननविरुद्ध ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे गुन्हेगार सराईत असून, संघटितपणे दरोडे, हाणामाºया, जबरी लूटसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.फरार दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हानसातपूरच्या एटीएम दरोड्यातील फरार संशयित दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. फरार दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी