शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तिघा सोनसाखळी चोरांवर ‘मोक्का’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:03 IST

शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने काही दिवसांपूर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्टसंघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून फरार होणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने काही दिवसांपूर्वी आवळल्या. सराईत गुन्हेगार सोमनाथ हिरामण बर्वे (३०,रा.मातोरी), नितीन निवृत्ती पारधी (२५,रा.फुलेनगर) आणि अनिल भाऊराव पवार (२३,रा.सय्यद पिंप्री) या त्रिकुटांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्टसंघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. चंदन चोरट्यांच्या टोळीनंतर शहरात सोनसाखळी चोरट्यांवर मोक्काची ही दुसरी कारवाई आयुक्तालयाकडून करण्यात आली.आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून सर्रासपणे सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत आहेत. सर्वाधिक गुन्हे इंदिरानगर, म्हसरूळ, पंचवटी, भद्रकाली या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत. या गुन्ह्यांना आळा बसावा आणि सोनसाखळ्या हिसकावणाºया गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण व्हावा, या उद्देशाने नांगरे-पाटील यांनी संघटितपणे जबरी चोरीसारखे गुन्हे वारंवार करणाºया या त्रिकुटांवर मोक्का लावला आहे. या त्रिकु टांपैकी दोघांनी मिळून २३ एप्रिल २०१९ रोजी औरंगाबादरोडवरील एका लॉन्स समोरून पायी जाणाºया स्वाती विजय परमेश्वर (रा. पुणे) यांच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळे वजनाचे ७२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तपास करून पेठ फाटा परिसरातून सोमनाथ बर्वे आणि नितीन पारधी यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्या दोघांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांचा सय्यदपिंप्रीमध्ये राहणारा साथीदार अनिल भाऊराव पवारच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात सुमारे नऊ जबरी चोºया केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.स्पोर्टस् बाइकवरून ‘रॉबरी’त्रिकुटांकडून ७ लाख ४७ हजार ५०० रु पयांच्या सोन्याच्या नऊ लगड जप्त केल्या आहेत. या टोळीचा प्रमुख नितीन पारधी हा सोनसाखळी ओरबाडण्यासाठी स्पोर्टस बाइकचा वापर करत होता. संघटितपणे गुन्ह्यांचे कट रचून शहरासह ग्रामीण भागात या त्रिकुटांनी महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी त्रिकुटांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का प्रस्तावित केला. त्यास मंजुरी मिळाली असून, त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील