शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी वांगेसटची केली कांदेसट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:13 IST

नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात,

नाशिक : नाशिकच्या कांद्याचा धसका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विशेष दक्षता घेण्यात आली आणि मोदी यांनीदेखील कांद्याच्या भावासाठी काय केले याचे रसभरीत वर्णन केले खरे मात्र भारतीय परंपरेत कांदे खाण्याचा विशेष दिवस असतो त्याला चंपाषष्ठी म्हणतात, असे सांगितल्याने जाणकारांना धक्का बसला. चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याच्या भरताचे आपल्याकडे महत्त्व आहे. चातुर्मासानंतर या दिवशी वांग्याबरोबरच कांदे आहारात सुरू केले जात असले तरी दिवसभर कांदे खाण्याचा मात्र तो दिवस नसतो. त्यामुळे मोदी यांच्या नव्या संस्कृती शोधाने तो चर्चेचा विषय ठरला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा नाशिक जिल्ह्णातील पिंपळगाव येथे होणार असल्याने शेतकऱ्यांच्या कांदा आंदोलनाचा त्यांनी आधीच धसका घेतला होता. त्यामुळे आंदोलने कशी टाळता येतील यावर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने विशेष काळजी घेतली आणि काटेकोर तपासणीत कोणी डोक्यावर ऊन ओकत असल्याने ऊन लागू नये म्हणून जवळ कांदा ठेवावा तर तेही नाकारण्यात आले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी सभेत कांद्याचा विषय काढलाच. कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने निर्यात शुल्क कमी केले तसेच कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन शुल्क लागू केले अशाप्रकारची माहिती देतानाच ते संस्कृतीवर घसरले.चंपाषष्ठी म्हणजे खंडेरावाच्या नवरात्राचा अखेरचा दिवस या दिवशी वांग्याच्या भरताचा नैवेद्य दाखवला जातो, तर चातुर्मासात कांदे- लसूण खाणे वर्ज्य असल्याने त्या आधी म्हणजे कांदे नवमीला कांद्याचे पदार्थ तयार केले जातात. तथापि, दिवसभर कांदे खाण्याची मात्र कोणतीही परंपरा नाही, असे जाणकार म्हणतात. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी म्हणजे नवमीला कांदे नवमी म्हणतात. त्या दिवसानंतर कांदा वर्ज्य असतो. तो चंपाषष्ठीलाच सुरू करतात. अनेक जण चंपाषष्ठीला वांगेसट म्हणतात. परंतु मोदी यांनी या दिवसाचे मात्र कांदेसटात रूपांतर केल्याने तो चर्चेचा विषय ठरला.परंपरेचे रसभरीत वर्णनआपल्याकडे वर्षातील एक दिवस असतो. त्या दिवशी दिवसभर कांदे खात असतात. त्याला चंपाषष्ठी म्हणतात असे सांगून मोदी यांनी या परंपरेचे रसभरीत वर्णन केले. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा म्हणून किती चांगली परंपरा सुरू केली. त्यात किती समाजहिताचा व्यापक विचार होता असे सांगून त्यांनी संस्कृतीचे गुणगान केले, परंतु त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीonionकांदा