शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मोदी सरकार राज्यघटना बदलण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:44 IST

देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे.

ठळक मुद्देराज्यघटना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज संविधान दिनानिमित्त मेळावा देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप

नाशिक : देशवासीयांना कॉँग्रेसने राज्य घटनेच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्याच हक्कात मोदी सरकार हस्तक्षेप करीत आहेत. आरक्षणाचा फेरविचार करण्याचे आवाहन वारंवार राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत आहे. शिवाय विविध कायदे बदलून देशातील सर्वोत्तम घटनाच बदलण्याचा घाट सरकार करीत आहे. अशावेळी राज्यघटना वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत कॉँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी व्यक्त केले.नाशिक शहर जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने येथील हॉटेल पंचममध्ये संविधान दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. विदेशी नेत्यांच्या तालावर चालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी व्यासपीठावर कॉँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, भाई नगराळे, डी. जी. पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. शोेभा बच्छाव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  काल-परवा उदयास आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात गेली साठ वर्षे सत्ता असलेल्या कॉँग्रेसने काय केले, असा वारंवार प्रश्न करतात. मात्र देशाला घटना देणाºया कॉँग्रेसने सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य घटना दिली आणि बॅँकेच्या राष्टÑीयीकरणापासून पंचायत राज व्यवस्थेपर्यंत तसेच यूपीए सरकारनेही रोजगार, शिक्षणाचा हक्क दिला. परंतु हेच अधिकार आता मोदी हटविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून मोहनप्रकाश यांनी देशातील नागरिकांनी शाकाहार करावा हेदेखील आता सरकार ठरवित आहे. धर्मनिरपेक्षता, जाती निर्मूलन या सर्वच चौकटींना मोडले जात आहे. आरक्षणाची समीक्षा करा, असे वारंवार सांगितले जात आहे.  तर अगदी ग्रामपंचायतीसाठीदेखील शिक्षणाची अट टाकून राजकीय हक्क डावलले जात आहेत, असेही ते म्हणाले. नोटाबंदी, जीएसटी हे निर्णय विदेशी नेत्यांच्या सूचनेनुसार घेतले जात आहेत. अशाप्रकारच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली असून, सर्व बॅँका एनपीएत गेल्या आहेत, असेही ते म्हणाले.  यावेळी शरद रणपिसे, विनायक देशमुख, भाई नगराळे आणि आमदार निर्मला गावित यांनी मनोगतात केंद्रातील भाजपा सरकारच्या कामकाजावर टीका केली. स्वागत शहराध्यक्ष शरद अहेर यांनी करताना शहर कॉँग्रेसच्या कामाचा आढावा घेतला.  प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सरकारच्या विरोधात चले जाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.  यावेळी व्यासपीठावर शाहू खैरे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. ममता पाटील, राहुल दिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.  आरएसएसच्या नागपूर येथील मुख्यालयावर कधीही तिरंगा फडकवला जात नव्हता आणि देशात लालकिल्ला किंवा अन्यत्र तिरंगा फडकविण्याची भाषा केली जात होती. सेवादलाचे आंदोलन आणि न्यायालयाच्या आदेशानुसार संघ कार्यालयावर तिरंगा फडकावा लागला. जे कार्यालयावर तिरंगा फडकवीत नव्हते आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले नाही, शिवाय गांधी हत्येनंतर मिठाई वाटली, असे संघाचे लोक आज राष्टÑवादाचे अजब धडे देत असल्याची टीका मोहनप्रकाश यांनी केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नोटबंदी केली आणि दुसºयाच दिवशी जपानच्या पंतप्रधानांना भेटले. त्यानंतर जीएसटी लागू करताना देशाला जणू स्वातंत्र्य मिळाले, असा उत्सव करण्यात आला आणि दुसºयाच दिवशी मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना आलिंगन देऊन भेटले. पूर्वी विदेशातील नेत्यांना हस्तांदोलन केले जात. आता मोदी यांनी झप्पी देण्याची नवी प्रथा आणली आहे. मोदी यांची ही झप्पी देशवासीयांना मात्र त्रासदायक ठरते आहे. कारण विदेशी नेत्यांच्या सांगण्यावरून नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय घेतले गेले, असा आरोप मोहनप्रकाश यांनी केला.

टॅग्स :GovernmentसरकारBJPभाजपा