शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

बागलाण परिसरात आधुनिक शेतीची कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:24 IST

बागलाण परिसरात आधुनिक शेतीची कास

 कंधाणे : आरम नदीचा वरदहस्त लाभलेला व एकेकाळी सुजलाम् सुफलाम् समजला जाणार बागलाणचा पश्चिमपट्टा. बेभरवशाचे पर्जन्यमान, शेती सिंचनाच्या अपुऱ्या सोयी-सुविधा, लोकप्रतिनिधींनी केलेला काणाडोळा यामुळे हा भाग उजाड माळरानाकडे वाटचाल करू लागला आहे.अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे शेती सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागला आहे. गरज ही शोधाची जननी असते. या युक्तीप्रमाणे कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे परिसरातील बळीराजाचा कल वाढला असून, कल्पनेला विचारांची झालरची जोड देत या भागातील शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. पारंपरिक शेतीला सोडचिठ्ठी देत आधुनिक टेक्नॉलॉजीमार्फत शेती करताना बळीराजा दिसून येत आहे.परिसरातील बळीराजाचा कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे कल वाढला असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठिबक सिंचन योजना दोन वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात आहे. भाजीपाल्याची शेती या भागाचा आर्थिक कणा समजली जाऊ लागली आहे. सततच्या दुष्काळामुळे येथील शेती सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस ऊग्र रूप धारण करू लागला आहे. ७० ते ८० फूट विहिरी आजमितीस १२० ते १३० फूट खोल गेल्या आहेत. भूगर्भातील जलसाठा घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चार-पाच वर्षांचा इतिहास पाहता विहिर काम करताना अनेक बळीराजांना आपला जीव गमवावा लागला आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या युक्तीप्रमाणे बळीराजाने विहीर कामाला स्थगिती दिली. आता प्रपंचाचा गाडा चालवावा कसा, या विचारात बळीराजा असताना काही शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून याचा प्रयोग केला. आज सर्वच शेतकरी कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या साधनांचा वापर करताना दिसून येत आहे. यासाठी शासनाच्या कृषी विभागाने मोलाची भर घातली आहे. ठिबक सिंचन योजनेला अनुदान हा मैलाचा परीस ठरला. यासाठी जनजागृती करून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना समजाविण्यासाठी विभागीय कृषी सहायक योगेश बोरसे, कांबळे, गायकवाड, तालुका कृषी अधिकारी विटनोर यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले आहे. (वार्ताहर)