शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यातील संतोष शिंदे टोळीतील सहा जणांना मोक्का 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 10:20 IST

श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी  श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे,  अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.

श्रीगोंदा : संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी  श्रीगोंदा तालुक्यातील राजापुर येथील संतोष राघु शिंदे याचे टोळीतील सहा गुन्हेगारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे,  अशी माहिती कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली.

संतोष राघु शिंदे, चंदु भाऊसाहेब घावटे,  राजेंद्र बबन ढवळे ( राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर),  चेतन काळुराम कदम,  सागर विनोद ससाणे( रा.  देवदैठण, ता. श्रीगोंदा),  राजु ऊर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुद ता. पारनेर),  शफिक शब्बीर शेख ( रा. नारायणगव्हाण ता. पारनेर)  याच्या विरोधात मोक्का लावला आहे. 

या  टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता तत्कालीन प्रभारी अधिकारी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी २६ जुन २०२१ रोजी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचेकडे पाठवला होता. त्या प्रस्तावास. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलमाप्रमाणे वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळाली.

या  टोळ्यांविरुद्ध दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रासह जबरी चोरी करणे, दरोडयाची तयारी करणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे, कट करुन व संगनमताने स्वतःचे व टोळीचे आर्थिक फायद्याकरीता दशहत निर्माण करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीप्रमुख व साथीदार यांचे वर वेळोवेळी प्रतिबंध कारवाई  करून ही टोळीची गुन्हेगारी वाढत होत असल्याने या टोळीविरुध्द प्रचलित कायद्यानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२) व ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. 

या आरोपींच्या विरोधातील गुन्ह्यांचा तपास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करणार आहेत. 

टॅग्स :ahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालयAhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी