शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:27 IST

नाशिक : रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सोमवारी (दि़१९) सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

ठळक मुद्देपाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध

नाशिक : रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सोमवारी (दि़१९) सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़

ठाणे येथील वाचळेनगरमधील रहिवासी मनोज सोनवणे (२१) या विद्यार्थ्याची औरंगाबादला परीक्षा होती़ या परीक्षेसाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कल्याण येथून बसला़ रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटल्यानंतर हायवे ओव्हरब्रिजजवळ रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या मनोजच हातास झटका देऊन आरोपी आकाश जाधव याने मोबाइल हिसकावला़ यामध्ये ते रेल्वेतून खाली पडल्याने डोक्यास व कपाळावर जखम तसेच हात फॅक्चर झाला होता़ या प्रकरणी आरोपी जाधव याच्या विरोधात नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़

जिल्हा व सत्र न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़ न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी जाधव यास सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक