शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फुलेनगरला मोबाइल चोरट्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:25 IST

पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़

ठळक मुद्देपूर्ववैमनस्य : संशयित फरार

पंचवटी: पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर पाटालगत प्रवीण लोखंडे हा सराईत मोबाइल चोरटा राहत असून, मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाटाजवळील झोपडपट्टीतील एका बोळीत लोखंडे व अन्य दोन तीन संशयितामध्ये पूर्ववैमनस्यातून वाद झाला़ त्यातून संशयितांनी लोखंडे याच्या डोक्यावर हातातील धारदार शस्त्राने वार केले व डोक्यात वर्मी घाव बसल्याने लोखंडे याचा जागीचमृत्यू झाला़ रक्ताच्या थारोळ्यात युवक पडलेला पाहून नागरिकांनी त्वरित पंचवटी पोलिसांनामाहिती दिली़ यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीधाव घेतली़ मात्र, तोपर्यंतरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोखंडे याचा मृत्यू झाला होता़पोलिसांनी त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे़सराईत गुन्हेगार लोखंडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरी तसेच शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले़ वर्चस्ववादातून खून झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना केली आहे.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून संशयितांची दुचाकी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे़ तसेच रक्ताचे नमुने व अन्य काही संशयास्पद वस्तू न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकाने तपासकामी जमा केल्या आहेत़ लोखंडे या गुन्हेगाराचा खून करणाºया संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असल्याचा दावा पंचवटी पोलिसांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून