शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवकांना अश्लील व्हिडिओ असलेले मोबाइल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:03 IST

केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना हा प्रकार आढळल्यानंतर हे मोबाइल जमा करण्यात आले असले तरी त्यावरून वातावरण पेटले आहे.

ठळक मुद्देसंताप : महिलांची निदर्शने, महापौरांची नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार

नाशिक : केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना हा प्रकार आढळल्यानंतर हे मोबाइल जमा करण्यात आले असले तरी त्यावरून वातावरण पेटले आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने महापालिकेसमोर निदर्शने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली, तर महापौर रंजना भानसी यांनी तातडीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देशभरात इलेक्ट्रिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क करण्यात येत असून, त्यासाठी एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. लसीकरणात एक शीत साखळी राखणे आवश्यक असते. त्यासंदर्भातील हे अ‍ॅप असून, त्यासाठी नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण एका खासगी हॉटेलमध्ये देण्यात येत होते. आयोजकांच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांना मोबाइलचे वाटप करण्यात आले आणि ते अ‍ॅक्टिव्हेट करण्यास सांगण्यात आले त्यानंतर अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे याबाबत माहिती दिली जाणार होती, परंतु काहींनी मोबाइल उघडल्यानंतर त्यात तीस ते पस्तीस अश्लील व्हिडिओ क्लिप आणि फोटो आढळल्याचे निदर्शनास येताच तातडीने मोबाइल परत घेण्यात आले. त्यासाठी तांत्रिक कारण देण्यात आले होते, परंतु या प्रकारानंतर मात्र शहरात संतापाची लाट आली आहे. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित अश्लील छायाचित्र आढळल्याने याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. अश्लील चित्रफित प्रकरणी अधिकाºयांवर कारवाई करा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.अश्लाघ्य आणि घोटाळाहीमहापालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित आणि अश्लील छायाचित्र आढळले आहे. प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या या नवीन स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफित आणि छायाचित्र असणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्रशासनाने नव्या मोबाइलमध्ये तीस ते पस्तीस फोटो व्हिडीओ क्लिप असल्याने हे याबाबत तांत्रिक कारण देत मोबाइल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले तरी या घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाची चौकशी करून सबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादीने केली.पोलीस आयुक्तांकडे तक्रारमहापालिकेच्या प्रशिक्षण शिबिरात हा प्रकार घडल्याने महापौर रंजना भानसी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. सदरचे प्रकरण अत्यंत गांभीर असून, त्या मागे कोण आहे, या सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणीही भानसी यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र