शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या कार्यालयात टोळक्याचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:27 IST

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळी अन्य कर्मचाऱ्यानी मध्यस्ती केल्याने हल्ला टळला.

ठळक मुद्दे चहा टपरी चे अतिक्रमण हटविताना वाद : वनरक्षकावर टिकावाने हल्ल्याचा प्रयत्न

नाशिक : वन विभागाच्या त्र्यंबकरोडवरील पूर्व-पश्चिम कार्यालयात अज्ञात टोळक्याच्या जमावाने विनापरवानगी शिरकाव करत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी (दि.24) घडली. यावेळी जमावातील एका अज्ञात समाजकंटकाने वनरक्षकावर टिकावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; यावेळी अन्य कर्मचाऱ्यानी मध्यस्ती केल्याने हल्ला टळला.त्र्यंबकरोडवर नाशिक पूर्व, पश्चिम वन विभागाचे उपवनसंरक्षक, नाशिक वनक्षेत्रपाल यांचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात विनापरवाना एका चौकीदाराच्या नातेवाईकांकडून चहा टपरी मागील काही वर्षांपासून चालविली जात आहे; मात्र कोरोनाचे प्रादुर्भाव तेजीने होत असताना शासकीय आदेशानुसार उपवनसंरक्षकांकडून वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना या टपरीचे अतिक्रमण हटविण्याबाबतचे लेखी आदेश प्राप्त झाले. यानुसार दोन दिवसांपूर्वी या चहा विक्रेत्याला समज देण्यात येऊन टपरी बंद करण्याबाबत सूचना करण्यात आली. कारण या टपरीवर चहा पिण्याच्या निमित्ताने लोकांची गर्दी होऊ लागली होती. यावेळी कोरोनावर शासनाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी भदाणे यांना याबाबत जाब विचारला आणि त्वरित चहा टपरी बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भदाणे यांनी या चहा विक्रेत्याला गाशा गुंडाळण्यासाठी 'खाकी'च्या शैलीत सांगितले असता तेथील चहा विक्रेत्याच्या नातेवाईक चौकीदाराने अज्ञात जमावाला बोलावून घेत वाद घातला. यावेळी जमावाला उपवनसंरक्षक कार्यालयात रोखण्यासाठी पुढे आलेले वनरक्षक मेजर दादा सोनवणे यांच्यावर जमावाने चाल केली. यावेळी एकाने तर थेट टिकाव उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून तात्काळ सरकारवाडा पोलिसांची मदत वनविभागाने बोलाविली. गस्तीपथकाचे वाहन दाखल होताच जमावाने पळ काढण्यास सुरवात केली. दरम्यान झालेल्या झटापटीत सोनवणे यांचा गणवेश फाटला. पोलिसांनी आपल्या शैलीत जमावाला पांगविले. वेळीच पोलीस दाखल झाल्यामुळे आक्रमक जमावांकडून शासकीय वाहने व कार्यालयाचे नुकसान होता होता टळले. एकूणच या सगळ्या अतिक्रमण हटविण्याच्या शासकीय कारवाईला संबंधितांकडून विरोध झाला. शासकीय कामात अडथळा आणत शासकीय कार्यालयात येऊन शिवीगाळ आरडाओरड, मारहाण करण्यापर्यंतचा धिंगाणा घातला गेला. या सगळया प्रकरणाबाबत मुख्य वनसंरक्षकांकडून काय पावले उचलली जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात वनविभागाकडून शासकीय स्तरावर कुठलीही तक्रार वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून करण्यात आलेली न्हवती.धिंगाणा सीसीटीव्हीत कैदअज्ञात जमावाने वनविभागाच्या कार्यालयात घातलेला सगळा धिंगाणा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्यालयीन सुरक्षेची जबाबदारी असलेल्या वनरक्षकांकडून जमावाला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने जमावाने त्यांच्यावर चाल करत गणवेशाचे नुकसान केल्याचेही सीसीटीव्हीत दिसून येते. 

 

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारी