शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाताला हमीभाव देण्यासाठी मनसेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:27 IST

राज ठाकरे : प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्वासन

ठळक मुद्देराज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी अनेक मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्रांचा कारखान्यांमध्ये रोजगार मिळवण्याचा हक्क कोणीही डावलू शकत नाही. भाताला हमीभाव देण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. धरणग्रस्त- प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र बदलविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.इगतपुरी येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना ते बोलत होते. राज यांनी सांगितले की, ह्या राज्यातील स्थानिक नागरिकांना इथल्या उद्योगधंद्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांच्या भाताला हमीभाव मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. विस्थापित झालेल्या पीडितांना न्याय देण्यासाठी माहिती घेऊन काम करण्यात येईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही यावेळी अनेक मुद्द्यांवर टीकेची झोड उठवली.दरम्यान, राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी विविध गावांतील कार्यकर्ते, विविध संघटना, शेतकरी, विद्यार्थी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी औक्षण करून स्वागत केले. विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विविध प्रश्नांवर निवेदने दिली. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा संघटक भगीरथ मराडे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत, रामदास आडोळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरे