शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मनसेला सत्ता राखणे कठीण

By admin | Updated: July 2, 2014 00:20 IST

मनसेला सत्ता राखणे कठीण

 

नाशिक : महापालिकेच्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यापाठोपाठ स्थायी समिती सभापतिपदाच्या वादावरून भाजपाशी झालेले मतभेद या पार्श्वभूमीवर पालिकेतील आगामी सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषत: स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत शब्द न पाळल्याने भाजपाने मनसेला यापुढे सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी संख्याबळाचा विचार करता आगामी महापौरपदासाठी मनसेला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सर्वाधिक म्हणजेच ४० जागा मिळाल्या होत्या, परंतु बहुमत मिळत नव्हते. अशावेळी भाजपाने मनसेला साथ दिली आणि मनसेची सत्ता येऊ शकली. दरम्यान, मनसेचे नगरसेवक असलेले हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते खासदारही झाले. त्यामुळे मनसेचे संख्याबळ एकने घटले आहे. म्हणजेच ३९ इतके आहे. रविवारी झालेल्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत एक जागा भाजपाने, तर एक जागा शिवसेनेने जिंकली आहे. भाजपाचे १४ नगरसेवक होते. दिनकर पाटील यांच्या विजयामुळे ही संख्या १५ वर गेली आहे. त्यानंतर प्रभाग ६१ मध्ये शिवसेनेचे केशव पोरजे निवडून आल्याने सेनेचे संख्याबळ २३ वर गेले आहे. म्हणजेच भाजपा सेना एकत्र आल्यास संख्याबळ ३८ इतके होते. जनराज्य आघाडीचे दोन आणि माकपाचा एक नगरसेवक युतीकडे असल्याने संख्याबळ ४१ वर जाते. दुसरीकडे कॉँग्रेसचे १४ आणि राष्ट्रवादीचे २० नगरसेवक एकत्र आले तर हीच संख्या ३४ होते. याशिवाय अपक्ष पाच आणि माकपाचे दोन नगरसेवक हे धर्मनिरपेक्ष पक्षांकडे गेल्यास ही संख्या ४१ वर जाते. साहजिकच महापौरपद युती, आघाडी आणि मनसे अशा सर्वांनाच सध्या तरी खुले मानले जात आहे. महापौरांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता होती; मात्र याबाबत अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. (प्रतिनिधी)