शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

मनसे नगरसेवक मटाले यांचा पाणी बचतीसाठी पुढाकार

By admin | Updated: November 16, 2015 21:36 IST

मनसे नगरसेवक मटाले यांचा पाणी बचतीसाठी पुढाकार

सिडको : नाशिक शहराच्या हक्काचे पाणी शासनाने मराठवाड्याला सोडल्याने भविष्यात नाशिक शहरवासीयांना पाणीटंचाई भासू नये यासाठी मनसेचे गटनेते व नगरसेवक अनिल मटाले यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी पाणी बचतीबाबतची पत्रके प्रभागात वाटप केली.शासनाने नाशिक शहराचे पाणी मराठवाड्याला सोडल्याने भविष्यात नाशिक शहरवासीयांना पाणीटंचाई सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता यात नाही. या विरोधात मनसेच्या वतीने महापौरांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही केले असून, यास विरोधही सुरूच आहे. नाशिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या मनमाड शहरात ३० ते ४० दिवसांनी पाणी येते. आपल्या जिल्ह्यातदेखील पाणीटंचाई सुरू झाली असून, याचाच एक भाग म्हणू प्रभाग क्रमांक ४८चे नगरसेवक अनिल मटाले यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता असल्याने आतापासूनच पाणी बचत करणे गरजेचे झाले आहे. यासाठी अनिल मटाले यांनी प्रभागात जनजागृती सुरू केली. पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळावा, अशा आशयाचे पत्रक प्रभागात वाटप करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना पत्रकाचे वाटप करून पाणी बचतीबाबत आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)