शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा निवडणूक लढविण्याचा फैसला सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 19:18 IST

राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली

ठळक मुद्देमहत्त्वाची बैठक : इच्छुक उमेदवारांना केले पाचारणअधिकृत भूमिका ठाकरे यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर ठाकरे हे निवडणुकीविषयी आपला निर्णय जाहीर करतील. ज्या अर्थी ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे त्या अर्थी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असा अंदाज बांधला जात आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती. परंतु कॉँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली. मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी घातलेली गळ पाहता, महाराष्टÑ नवनिर्माण सेना निवडणूक लढविणार नाही, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली गेली होती. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबतची तयारी सुरू केली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती घेण्याबरोबरच विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मात्र त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होवून पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका अद्याप जाहीर केलेली नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने मनसेला काही तरी निर्णय लवकर घ्यावी लागणार असून, त्यापार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत सकाळी १० वाजता राज ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवारांना पाचारण केले आहे. पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही, त्यांनी बैठकीसाठी येऊ नये अशा सूचनाही पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाची अधिकृत भूमिका ठाकरे यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकMNSमनसे