शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:42 IST

घोटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका खटल्यात जामीन मंजुर केला.

घोटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका खटल्यात जामीन मंजुर केला. खटल्याच्या सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना न्यायालयाने जातीने हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यामुळे मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील राजसमर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली. फटाक्यांच्या जल्लोषात त्यांचे समर्थकांनी स्वागत करून पुष्पगुच्छ देण्यासाठी रीघ लावली. दैनंदिन खटल्याच्या सुनावणीला आलेल्या पक्षकारांना खोळंबून राहावे लागले. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २००८ मध्ये रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळाले असल्याने अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले. त्यामुळे राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटलवर मनसे सैनिकांनी हल्ला केल्याची घटना झाली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची न्या. के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आलेली असली तरी पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचे नाव खटल्यात दाखल आहे. सुनावणी काळात त्यांनी न्यायालयात एकदाही उपस्थिती न दाखविल्याने अखेर इगतपुरी न्यायालयाने त्यांना मंगळवारी हजर राहण्याची अंतिम संधी दिली. त्यानुसार राज ठाकरे उपस्थित राहिले. अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. सुशील गायकर,अ‍ॅड. शिरोडकर यांनी इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांचे वकीलपत्र घेऊन त्यांना जामीन देण्याची मागणी केली. न्यायालयाने जामिनाची मागणी मान्य केली. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, अ‍ॅड. राहुल ढिकले हे ठाकरे यांना जामीन राहिले. न्यायालयाला ह्या खटल्यात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार बाळा नांदगावकर, भगीरथ मराडे, रामदास आडोळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक