शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सीमा हिरे यांच्या अंगरक्षकाची तरुणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:54 IST

यावेळी झालेल्या बाचाबाचीत हिरे यांच्या अंगरक्षकाने काही तरुणांना मारहाण केल्यानंतर ग्रामस्थ धावून आल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

शहापूर/कसारा : नाशिक येथील भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मोटारीला कसाºयाजवळ दुस-या मोटारीने धडक दिली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत हिरे यांच्या अंगरक्षकाने काही तरुणांना मारहाण केल्यानंतर ग्रामस्थ धावून आल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे परस्परांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.  आमदार हिरे या शुक्रवारी सकाळी नाशिकहून मुंबईकडे निघाल्या होत्या.

कसा-याजवळ एका मोटारीने धडक दिल्यामुळे हिरे यांची मोटार बाजूला फेकली गेली. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी आणि त्यांचा अंगरक्षक ओव्हळ होता. अपघातानंतर धडक दिलेल्या मोटारीचा चालक व त्यातील चार तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना हिरे यांचा मोटार चालक तसेच अंगरक्षकाने पाठलाग करु न त्यांना पकडले. त्यावेळी बाचाबाची व हाणामारी झाली.  ग्रामस्थ जमल्यानंतर प्रकरण कसारा पोलीस ठाण्यात गेले. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कारवाईची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दोघांची समजूत घातली. त्यानंतर एकमेकांची माफी मागून प्रकरण मिटवण्यात आले.नाशिकहून मुंबईला जात असताना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या एका मोटारीने आमच्या गाडीला धडक दिली आणि नंतर ते पळून गेले. त्यामुळे आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अडवले. अपघात करून पळून जाणे हे चुकीचे असल्याने त्यांना विचारणा करण्यासाठी अडवले तेव्हा त्या मोटारीतील दहा ते बारा स्थानिक युवकांनी थेट क्रिकेटची बॅट वैगरे साहित्य घेऊन मारण्यासाठी धावले. त्यामुळे त्यांच्याशी बॉडीगार्डची झटापट झाली. हे युवक स्थानिक असल्याने त्यांनी ग्रामस्थांना बोलविल्यानंतर वाद पोलीस ठाण्यात गेला.

तेथे त्या युवकांनी माफी मागितली. त्यांच्या भवितव्याचा विचार करून आम्हीही पोलिसांत तक्रार केली नाही. गाडीत माझी मुलगी, बॉडीगार्ड आणि चालक तसेच मी असे चौघेच होतो. गाडीला अत्यंत जोराची धडक बसल्याने आमची मानसिकता ठीक नसताना संबंधित युवकांनी हल्ला केला. अशास्थितीत बॉडीगॉर्ड किंवा मी रिव्हॉल्वर दाखवून धमकविल्याचे चुकीचे वृत्त काही माध्यमांनी दाखविले. असा कोणताही प्रकार घडला नव्हता. -सीमा हिरे, आमदार

टॅग्स :AccidentअपघातMLAआमदार