शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:28 IST

नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.

ओझर : नाशिक जिल्हा मराठा समन्वय समिती व मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी आमदार अनिल कदम यांच्या कार्यालयाजवळ मंगळवारी सकाळी आंदोलन करून विविध मागण्यांसाठी विधिमंडळात अधिक आक्रमक होण्याचे आवाहन केले.  यावेळी आमदार कदम यांनी बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षाची भूमिका हीच माझी असल्याने गेल्या विधिमंडळ अधिवेशनात मराठा समाजाचा अंत बघू नका अन्यथा उद्रेक होईल असा इशारायापूर्वीच आपण सरकारला दिला होता, याचाच प्रत्यय आता येत  आहे.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे हीच शिवसेना पक्षाची भूमिका असून, या अधिवेशनात मराठा समाजाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडू, अशी ग्वाही कदम यांनी सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनप्रसंगी दिली.मराठा समाजाच्या वतीने कदम यांच्या संपर्ककार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक तथा छावाचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक गणेश कदम, राजेंद्र देसले, तुषार जगताप, उमेश शिंदे, माधवी पाटील, शिवाजी मोरे, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. करण गायकर यांनी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानत राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हा समन्वयक उमेश देशमुख यांनी मराठा समाजाची विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे बाजू मांडावी अशी मागणी केली.तुषार जगताप यांनी सरकार फसव्या घोषणा करीत असल्याची टिका केली. शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड यांनी शिवसेना सकल मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंत गवळी, सतीश नवले, गणेश कदम यांनी सकल मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली.  यावेळी सुभाष होळकर, केशवराव बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, अशोक निफाडे, दशरथ रूमणे, उपसरपंच सागर शेजवळ, पं. स. सदस्य पंडितराव आहेर, ग्रा. पं. सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, सतीश नवले, प्रशांत पगार, नितीन काळे, विशाल मालसाने, अमित कोळपकर, सतीश पगार, विक्रम शेजवळ आदी उपस्थित होते.आंदोलनात राजकारण आणू नये : कदमकदम यांनी मराठा बांधवांच्या भावनांना हात घालत ज्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. स्थगन प्रस्तावाबाबत विरोधकांचीच मोठी कोंडी झाल्याचे कदम यांनी सांगितले. या आंदोलनात कोणीही राजकारण आणू नये. समाजासाठी सर्वात पहिली भूमिका मीच मांडून आताच्या परिस्थितीची जाणीवदेखील करून दिली होती. ओझर येथील मोठा बंदोबस्त तैनात होता; परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन पार पडले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMLAआमदार