शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये समाजकंटकांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 11:01 IST

पंचवटी सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौक परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या शुक्रवारी (29 जून) पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक - पंचवटी सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौक परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या शुक्रवारी (29 जून) पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर संशयितांनी परिसरातील काही नागरिकांच्या घरावरही दगडफेक केल्याचे परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे. परिसरात घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांत काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते.

याबाबत माहिती समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हेशोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शिवाजीचौक परिसरातील रस्त्यालगत काही नागरिकांनी नेहमीप्रमाणे आपल्या चारचाकी शुक्रवारी रात्रीच्या सुमाराला उभ्या केल्या होत्या पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास काही अज्ञात टवाळखोरांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या काचा कशानेतरी फोडल्या त्यानंतर संशयितांनी परिसरात राहणाऱ्या मुठाळ नामक व्यक्तीच्या घरावरही दगडफेक केल्याचे समजते.

परिसरात मध्यरात्रीच्या सुमाराला काही मद्यपी तसेच टवाळखोरांचा वावर असून शिवाजी चौकात दहशत माजविण्याचा उद्देशानेच टवाळखोरांनी उद्या वाहनांच्या काचा फोडून दगडफेक केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे शुक्रवारी सकाळी चारचाकी वाहनांच्या  काचा फोडल्या चे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती संशयितांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या मारुती 800 (एम एच 15 ए एस 1930, मारुती ओमनी कार क्रमांक (एम एच 15 ए एस 6338), मारुती अल्टो कार (एम एच 15 डी एम 7454) व अन्य एक अशा चार वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेनंतर वाहनांच्या मालकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.                                   संशयितांवर कारवाई करणारसीतागुंफा रोडवरील शिवाजी चौकात शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी उभ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात तत्काळ भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. वाहनांच्या वाचा फोडणाऱ्या संशयितांवर कारवाई केली जाणार असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य म्हणून तपासकामी संशयितांची नावे समजल्यास तत्काळ माहिती द्यावी. - मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी.

टॅग्स :Crimeगुन्हा