शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आम्हीच ज्ञानी असल्याचा काही नेत्यांचा अर्विभाव; विखे पाटलांचा नाव न घेता पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 12:03 IST

काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे.

नाशिक-  राज्यात पूर परिस्थिती गंभीर असतानाही सरकार चांगलं काम करीत आहे. मात्र काही जण आम्हीच ज्ञानी आहोत अशा अर्विभावात काम करत असतात असा टोला राज्याचे गृह निर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आज नाशिकमध्ये लगावला. 

देशाचा स्वातंत्र्य दिन नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

राज्यात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पुरामुळे नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे अशा वेळी सरकार चांगले काम करीत आहे असे सांगून काही विरोधी नेते खूपच ज्ञानी असल्यासारखे वागत असतात. त्यात काही विशेष नाही विरोधी पक्ष नेत्यांचे ते कामच असते मी पण विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं आहे असेही विखे पाटील म्हणाले. पालकमंत्री म्हणून कोणाला कोठे नियुक्त करावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. नाशिक किंवा अहमदनगर अशा कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली तर आपण अवश्य पार पाडू असेही विखे पाटील म्हणाले 

बुधवारी शरद पवार यांनी कोल्हापूरात पूरग्रस्तांची पाहणी करताना राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. काही ठिकाणी ट्रक अडवले जात असल्याची माहिती आहे. शासनाने गरजू पूरग्रस्तांना ही मदत पोहचेल अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सरकारमधील लोकांना अशा परिस्थितीला तोंड देण्याचा अनुभव नाही. काही गावांना भेटी देऊन निघून गेल्यानं काम होतं नाही. राज्यकर्ते याठिकाणी असताना प्रशासनाची हालचाल तातडीने होते. लातूरला भूकंप झाला तर मी 15 दिवस तिथे होतो अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली होती.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलfloodपूर