शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

किमान तापमान ९.१अंश : राज्यातील नीचांकी नोंद पुन्हा नाशकातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 15:45 IST

पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देवाईन कॅपिटल बनले 'कुल सिटी'पारा सातत्याने घसरतोय

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कहर सुरुच असून मंगळवारी (दि.९) पारा पुन्हा एक अंशाने खाली घसरला. थंडीच्या वाढत्या कडाक्याने नाशिककर गारठून गेले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रसह विदर्भही गारठण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशकात ९.१अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. मागील चार दिवसांपासून नाशिक शहराचे वातावरण कमालीचे थंड झाल्याने ह्यवाईन कॅपिटलह्ण सध्या राज्यातील ह्यकुल सिटीह्ण बनले आहे. सलग तीसऱ्या दिवशी नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंड शहर ठरले.शहराचे किमान तापमान रविवारी १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. मंगळवारीसुध्दा पारा घसरल्यामुळे थंडीत अधिकच वाढ झाल्याच अनुभव नाशिककरांना येत आहे. पहाटे थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. पहाटेपासून सुर्योदयापर्यंत शहराने धुक्याची दुलई पांघरलेली होती. त्यामुळे सकाळी नाशिककरांना जणु आपण महाबळेश्वर, कुलुमनाली किंवा माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तर नाही ना? असा प्रश्न पडला होता. सकाळी नाशिककरांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्याचेही दिसून आले. गोदाकाठासह विविध झोपडपट्टयांमध्ये शेकोट्यांपासून उब घेत थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. दिवसभर थंड वारे वाहत राहिल्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्यामुळे नाशिककर सकाळपासून रात्रीपर्यंत ऊबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहे.शनिवारी संध्याकाळपासून नागरिकांना थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे.पुढील काही दिवस नागरिकांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. शहरात दिवसा तसेच रात्रीही आकाश पूर्णत: निरभ्र राहत असल्याने पारा वेगाने घसरत असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.महाबळेश्वर १२.४ तर नाशिक ९.१राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणुन ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये मंगळवारी १२.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले तर नाशिकमध्ये त्यापेक्षाही कमी ९.१ अंश तापमानाची नोंद झाली. सलग मागील आठवडाभरापासून महाबळेश्वरच्या तुलनेत नाशकातील हवामान अधिक थंड राहत असल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. 

 

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान