शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लाखो लिटर पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:51 IST

भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठेनगर यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रास चोरी सुरू असतानासुद्धा कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठेनगर यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रास चोरी सुरू असतानासुद्धा कारवाई गुलदस्त्यातच असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे. भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, सादिकनगर, अण्णा भाऊ साठेनगर आदी परिसर हातावर काम करणाºयांची लोकवस्ती म्हणून ओळख आहे तर काहींनी गुंठे वार पद्धतीने जागा घेऊन घरे बांधली आहेत. हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असून, त्यापैकी बहुतेकांनी अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतली आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून अनधिकृतपणे नळजोडणी करून घेताना त्यांना कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी येत नाही. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची सर्रासपणे चोरी होत असून, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल लाखो रु पयांनी बुडत आहे. महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी ४५ दिवसांची अभय योजना राबवली होती. मात्र या योजनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सदर योजनेंतर्गत नागरिकांना अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी शेवटची संधी म्हणून २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही अद्यापपर्यंत परिसरातील अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून घेण्यासाठी नागरिकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे. शेकडोच्या संख्येने असलेल्या अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई केव्हा होणार आणि लाखो लिटर पाण्याची व पाणीपट्टी महसुलाची बचत केव्हा होणार, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.विद्युत मोटार लावून पाणी उपसापांडवनगरी परिसरात सुमारे अडीच हजार सदनिका असून, यापैकी सुमारे ७५ टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तीन मजली अपार्टमेंट असल्याने आणि कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त असल्याने पाणी पुरत नाही. त्यामुळे काही नागरिकांनी एकाच घरात दोन नळजोडणी करून घेतली आहे. त्यामुळे परिसरात नळजोडणीची संख्या दिवसगणिक वाढत असून त्यामुळे लाखो रु पयांचा पाणीपट्टी महसूल बुडत आहे. अनधिकृत नळजोडणी त्यात काहींनी तर विद्युत मोटारी लावून जणू काही पाणी घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे. पोलीस बंदोबस्ताअभावी मनपा कर्मचारी अनधिकृत नळजोडणीधारकांवर कारवाई करण्यास धजत नसल्याचे समजते. वडाळागावातील काही गोठेधारकांनी तर जलवाहिनीस विद्युत मोटार लावून सर्रासपणे पाण्याची चोरी सुरू ठेवली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी