शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लाखो सेवेकऱ्यांनी केले घरच्या घरी श्रीगुरुचरित्र पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:13 IST

त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला. 

ठळक मुद्देस्वामी समर्थ केंद्रांवर श्री दत्त जन्मोत्सव सोहळा

त्र्यंबकेश्वर/ दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र, दिंडोरी तसेच समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरसह देश व देशाबाहेरील जवळपास ९ हजार केंद्रांवर सेवेकऱ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत श्री दत्त जन्मोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला.                                             या निमित्ताने गेल्या आठवडाभरात मोजक्या सेवेकऱ्यांनी समर्थ केंद्रांवर तर आपापल्या घरी जगभरातील लाखो सेवेकरी व भाविकांनी श्रीगुुरुचरित्र, नवनाथ, भागवत, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारमृत ग्रंथांची पारायणे केली. सर्वच केंद्रांवर पहाटेपासूनच श्री दत्त जयंतीनिमित्ताने लगबग दिसून आली. दिंडोरी दरबारात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते सकाळपासूनचे सर्व पूजा विधी संपन्न झाले.

                     बारा वाजेनंतर श्रीगुुरुचरित्रामधील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू करण्यात आले. या अध्यायात ह्यतीन बाळे झालीह्ण या ओवीचे बरोबर १२.३९ मिनिटांनी वाचन होताच उपस्थित सर्व भाविक, सेवेकरी यांनी ह्यअवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तह्ण असा जयघोष करत श्री दत्त जन्माचा आनंद साजरा केला. दिंडोरीत उपस्थित मोजक्या प्रतिनिधींशी अण्णासाहेब मोरे व त्र्यंकेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांनी हितगुज केले.

                             श्री दत्तात्रय महाराज यांनी विविध अवतारात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा परिचय त्यांनी करून दिला. याबरोबरच श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेऊन येत्या वर्षात आणि भविष्यकाळात सेवा मार्गाच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देऊन या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही गुरुमाउली यांनी केले.

गोरगरिबांना अद्ययावत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा त्या सुध्दा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सद्गुरू मोरे दादा हॉस्पिटलचा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला असून, तो सर्वांच्या सहकार्याने लवकरच पूर्णत्वास नेण्याचा मानस गुरुमाउली यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक