शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कांदा बियाणांमुळे लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:34 IST

कंधाणे : कंधाणेत एका खाजगी कृषि फार्मकडून आणलेल्या कांदा बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली असुन दोन महीन्याच्या झालेल्या कांदा पिकाला संपूर्ण डोंगळे निघाले असुन कांदा पिकाचा रंग ही एक सारखा नसल्याने येथील शेतक-यांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे. संबंधित बियाणे मालकाला याबाबत सुचना देवुनही त्याने याकडे दुर्लक्ष केले असुन नुकसानग्रस्त शेतक-यांना दाद नसल्याने या शेतकऱ्यांनी अखेर पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

ठळक मुद्देकंधाणेत बळीराजांनी गाठले पोलिस महानिरीक्षकांचे दालन

कंधाणे : कंधाणेत एका खाजगी कृषि फार्मकडून आणलेल्या कांदा बियाणात शेतक-यांची फसवणूक झाली असुन दोन महीन्याच्या झालेल्या कांदा पिकाला संपूर्ण डोंगळे निघाले असुन कांदा पिकाचा रंग ही एक सारखा नसल्याने येथील शेतक-यांना लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला आहे. संबंधित बियाणे मालकाला याबाबत सुचना देवुनही त्याने याकडे दुर्लक्ष केले असुन नुकसानग्रस्त शेतक-यांना दाद नसल्याने या शेतकऱ्यांनी अखेर पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.चालु हंगामात अवकाळी पावसाने या भागातील लागवडीसाठी तयार केलेली कांदा बियाणे वाया गेली होती. बियाणे वाया गेल्याने कांदा उत्पादक कंपनीने आपल्या कंपनीच्या वाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करत चढ्या भावाने कांदा बियाणांची विक्री केली होती. पावसाने शेतात टाकलेली बियाणे वाया गेल्याने बळीराजांनी हातउचल व कर्जाऊ रक्कमा काढत कांदा बियाणे खरेदी केले व त्याची लागवड केली आहे. कंधाणे येथील दहा ते पंधरा शेतकरी वर्गाने कंधाणे येथे विक्रीसाठी आलेल्या धुळे येथील एका कृषि फार्मने बियाणांची लाखो रूपयांची खरेदी केली. कांदा बियाणे शेतात टाकून नंतर रोप तयार केल्यानंतर डिसेंबर माहिन्यात कांदा लागवड केली. कांदा लागवडीपर्यंत चांगली दिसणारी बियाणे आजमितीस कांदा पिकास संपूर्ण डोंगळे आले असुन पिकाचा रंग ही वेगवेगळा असल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे.बोगस कांदा बियाणांमुळे कांदा उत्पादनात घट निर्माण झाली असुन संपुर्ण रब्बी हंगाम वाया गेला असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित कांदा बियाणे उत्पादकांने महागड्या दराने कांदा बियाणे विक्री करत कोणतेही अधिकृत बील संबधित शेतक-यांना दिले नाही. बील नंतर देतो अशी थाप देत लाखो रूपयांच्या बोगस बियाणांची विक्री कंधाणेत केली असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधितांला प्रत्यक्षात शेताच्या बांधावर बोलवत पिक पाहणी करण्याची विनंती केली असता विक्रेत्यांने उडवाउडवीची उत्तरे देत शेतक-यांनाच धमकावले आहे.फसवणूक झालेल्या शेतक-यांनी दोषींवर कडक कारवाई व्हावी व आपल्याला न्याय मिळावा म्हणुन आपल्या मागणीचे निवेदन नाशिक पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना दिले आहे.संबंधित विक्रेत्याकडून मी ५५०० रूपये किलो प्रमाणे २५ किलो बियाणे खरेदी केले असुन, साधारणपणे सहा ते सात एकरात या धुळे येथील कृषी फार्मकडील कांदा पिकाची लागवड केली आहे. आजमितीस संपुर्ण कांदापिकाला डोंगळे निघाले असुन कांदा पिकाला रंग ही एकसारखा नसल्याने माझे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.- रवि बिरारी, शेतकरी.कंधाणेतील शेतकरी वर्गाची कांदा बियाण्यात फसवणूक झाली असल्याची तक्रार प्राप्त झाली असुन संबधित लागवड केलेल्या क्षेत्राला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करून कांदा बियाणे बोगस असल्यास संबधित विक्रेते व उत्पादक कंपनीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल यापुढे शेतकरी वर्गाने नोंदणीकृत व परवाना धारक विक्रेत्याकडून खते व बियाणे खरेदी करून आपली फसवणूक टाळावी.- सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण.

(०६ कांदा १)

टॅग्स :agricultureशेतीCrime Newsगुन्हेगारी