शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

दुधाची टंचाई, चहासाठी भटकंती

By admin | Updated: September 25, 2015 22:30 IST

दुधाची टंचाई, चहासाठी भटकंती

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या आणि अखेरच्या शाही पर्वणीला लक्षावधी भाविकांनी हजेरी लावली आणि गावातील हॉटेल्ससह खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायात प्रचंड आर्थिक उलाढाल झाली. वाढत्या गर्दीमुळे अनेक हॉटेल्समधील दुधाचा साठा संपला आणि चहाची तलफ भागविण्यासाठी भाविकांना भटकंती करावी लागली.तिसऱ्या शाही पर्वणीला गुरुवारीच भाविकांनी त्र्यंबकेश्वरी दाखल होत तीर्थराज कुशावर्तावर स्नान केले. त्यानंतर शाही मिरवणुकीचा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांनी मिळेल तेथे जागा पटकावली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल्स भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाल्याचे बघायला मिळाले. त्र्यंबकेश्वरातील एकमेव तारांकित हॉटेल्सही पूर्णपणे आरक्षित झालेले होते. छोट्या स्वरूपातील चहाच्या ठेल्यांवरही चहापानासाठी भाविकांची भरगच्च गर्दी होती. शाही मिरवणूक मार्गावरील हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मात्र, सकाळच्या सुमारास गावातील बहुसंख्य हॉटेल्स व चहाच्या टपऱ्यांवरील दुधाचा साठा संपल्याने चहाची तलफ भागविताना अनेकांची मोठी अडचण झाली. गावात जागोजागी चहाबाबत विचारणा करण्यात येई त्यावेळी दूध शिल्लक नसल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे चहासाठी भाविकांना भटकंती करावी लागली. ज्याठिकाणी चहा उपलब्ध होता तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली.