शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीने ५० टक्के मका पीक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:36 IST

विठेवाडी : शेतकऱ्याने पिकावर फिरवला रोटर

ठळक मुद्देबंहुताश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी अळीचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रूपये खर्च करूनही उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही.

लोहोणेर : यावर्षी वेळेवर पाउस झाल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात पडलेल्या पावसानंतर मका पिकाची लागवड केली आहे.परंतु, मक्याच्या रोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी, शेतकरी पिकांवर रोटर फिरवत आहेत.देवळ्यासह कसमादे परिसरात शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्यावेळी दर २२०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसला व मक्याचे दर ११०० रुपयांपर्यंत खाली घसरले. शासनाने हमी भावाने खरेदी सुरु केली असली तरी पुरेसे बारदाण, वजन काटे, गोडाउन उपलब्ध नसल्याने खरेदी कासव गतीने सुरू आहे. अशाही परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे मध्ये मागील पंधर वड्यात ७० ते ८० टक्के शेतक-यांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा या तालुक्यांमध्ये विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर, बगडु, परीसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पिक समजुन लागवड झालेली आहे. परतु सुरु वातीच्या काळात सुस्थितीत दिसणारी मक्याची रोपे आता लष्करी अळीने घेरली गेली आहेत. बंहुताश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी अळीचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रूपये खर्च करूनही उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी रोपांवर रोटर फिरवित आहेत. विठेवाडी येथिल प्रगतीशिल शेतकरी माजी सरपंच नंदलाल निकम यांनी चार एकर मका पिकावर रोटर फिरवला. सदर घटना त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांनाही कळविली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक