नाशिक : धुळे येथे रिक्षाला कट मारल्याची कुरापत काढून मालेगाव येथे जुना मुंबई-आग्रा महामार्गावर ताज हॉटेलसमोर एसटी बस अडवून चालक व वाहकास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.फैजल खान इलियास खान (२५, रा. गुलशेरनगर डेपो गल्ली नं. ९) आणि जावीदखान मोहम्मद खान (२३, रा. मास्टरनगर) अशी अटक केलेल्या संशतयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्कलकुआ आगाराचे चालक विजय सोनजी सोनीजी (४०, रा. बोराडी, ता. शिरपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादी अक्कलकुआ-मालेगाव बस (क्रमांक एम. एच. ०६, एस. ८७३८) चालवत असताना धुळे येथे रिक्षाला कट मारल्याची कुरापत काढून संशयितांनी मालेगावी ताज हॉटेल जवळ बस समोर रिक्षा आडवी लावली. बसमध्ये प्रवेश करून बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादीस वाचविण्यासाठी वाहक जितेंद्र पाटील आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच प्रवाशांना दमदाटी करून बसमधून खाली उतरवून दिले. बसचा साईड ग्लास तोडून नुकसान केले. याप्रकरणी अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
वाद धुळ्यात, राडा मालेगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:56 IST
नाशिक : धुळे येथे रिक्षाला कट मारल्याची कुरापत काढून मालेगाव येथे जुना मुंबई-आग्रा महामार्गावर ताज हॉटेलसमोर एसटी बस अडवून चालक व वाहकास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
वाद धुळ्यात, राडा मालेगावी
ठळक मुद्देदोघांना अटक : बस चालक-वाहकास मारहाण