शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सिडकोच्या पवननगर रस्त्यावर मध्यपींचा धिंगाणा; वाहनांवर फिरकावले दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 13:33 IST

हा सर्व प्रकार घडत असताना पोलिसांना त्याचा मागमूस लागला नाही. टवाळखोरांच्या दगडफेकीमध्ये किरण जाधव यांच्या मोटारीचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे टोळक्याने हातात दगड, विटा घेऊ न वाहनांवर भिरकावले. मद्यपी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने घातला धुडगूस धुडगूसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : सिडको परिसरातील उत्तमनगर-पवननगर रस्त्यावर मद्यपी टवाळखोरांच्या टोळक्याने धिंगाणा घालत रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये वाहनांच्या काचा फुटल्या. अचानकपणे सुरू झालेल्या धुडगूसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.सिडको परिसरात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्था ढासाळली असून पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मद्यपी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने घातलेला धुडगूस ते सांगण्यास पुरक आहे. टवाळखोरांच्या टोळक्याने हातात दगड, विटा घेऊ न वाहनांवर भिरकावले. त्यांनी सुरू केलेला हा दहशत माजविण्याचा प्रकार बघून कोणीही त्यांना हटकण्याची हिंमत केली नाही. हा सर्व प्रकार संध्याकाळच्या सुमारास घडत असताना पोलिसांना त्याचा मागमूस लागला नाही. टवाळखोरांच्या दगडफेकीमध्ये किरण जाधव यांच्या मोटारीचे नुकसान झाले.

त्यांनतर टवाळखोरांनी येथून पळ काढला. अनेक दिवसांपासून पवन नगर, उत्तम नगर रस्त्यावर असे प्रकार सुरु आहेत. मद्याच्या नशेत बेदरकारपणे वाहने चालवून तसेच रिक्षांमधील साऊंडसिस्टमचा दणदणाट करुन स्टंटबाजी या रस्त्यावर वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मद्यपी टोळक्यांच्या ओल्या पार्ट्या पवननगर मैदानावर राजरोसपणे रंगत असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे सिडकोवासियांचे म्हणणे आहे. परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम हाती घेऊन टवाळखोर मद्यपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcidcoसिडको