शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला दोघा भावंडांवर धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:21 IST

पूर्ववैमनस्यातून दोघा भावंडांसह त्यांच्या आईस बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील स्नेहनगरमध्ये घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित फरार झाले आहेत़

पंचवटी : पूर्ववैमनस्यातून दोघा भावंडांसह त्यांच्या आईस बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील स्नेहनगरमध्ये घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित फरार झाले आहेत़  म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहितीनुसार स्नेहनगर येथील प्रीती पार्क अपार्टमेंटमधील सुजित भास्कर पगारे हा रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ते पाववडा आणण्यासाठी गेला होता. भाऊ मंगेश पगारे याच्याशी बोलत असताना दोन दुचाकीवर संशयित पोलीसपुत्र प्रवीण काकड, संदीप कदम, अमोल काळे ऊर्फ फल्ले व पुष्पक शिंगाडे असे चौघेजण आले़ त्यांनी तू आमच्या बाल्याभाईला का मारले असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करून धारदार शस्त्राने वार केले.यानंतर पगारे भावंडे घरी गेले असता संशयितांनी घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ केली तसेच पगारे यांची आई सुनंदा यांनाही जबर मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता़ या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, शांताराम पाटील, सुभाषचंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती़मोरे याच्यावरून वादशहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या निखिल ऊर्फ बाल्या मोरे या सराईत गुन्हेगाराचा गेल्यावर्षी पूर्ववैमनस्यातून गतवर्षी खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोन गटांत वाद सुरू झाले असून, काही दिवसांपूर्वी म्हसरूळ शिवारात हाणामारी, शस्त्राने वार अशा घटना घडलेल्या आहेत़‘त्या’ पोलीसपुत्राची दहशतपोलिसांच्या नाकीनव आणणारा पोलीसपुत्र संशयित प्रवीण काकड याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत़ या पोलीस पुत्राकडून परिसरात एखाद्यास मारहाण, शस्त्र घेऊन फिरणे, दहशत माजविण्यासारखे प्रकार करीत असल्याने म्हसरूळ पोलीस कर्मचारी मेटाकुटीला आले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी