पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथील कृष्णा हाईट्स समोर रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.कलानगर पोकार सरोवर येथे राहणाºया शिल्पा रघुनाथ धात्रक या दिंडोरीरोड, कोठुळे डेअरी समोरून बहीणकडे पायी जात असताना मागून लाल काळ्या रंगांच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी धात्रक यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यावेळी धात्रक यांनी सोनसाखळी घट्ट पकडून ठेवली, परंतु जोराचा हिसका बसल्याने अर्धी सोनसाखळी तुटली तर अर्धी सोनसाखळी घेऊन चोरटे पसार झाले.याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर हे करत आहे.
म्हसरूळला सोनसाखळी हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 02:41 IST
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथील कृष्णा हाईट्स समोर रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.
म्हसरूळला सोनसाखळी हिसकावली
ठळक मुद्देम्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल