शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी विविध समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:24 IST

दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पंचवटी : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनाकडे सुखसुविधा पुरविण्याची मागणी करूनदेखील प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी करत अजून किती दिवस म्हसोबावाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुख-सुविधेसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका प्रशासनाने घंटागाडी योजना सुरू केली. त्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस म्हसोबावाडी परिसरात घंटागाडी फिरकली. मात्र त्यानंतर अद्याप घंटागाडी आली नसल्याचे सांगत नागरिकांना कचरा उघड्यावरच फेकावा लागतो. सुमारे आठशे ते हजार लोकवस्ती या भागात असली तरी मनपा स्वच्छता विभागाचे कर्मचारी येत नाही. औषध फवारणी होत नाही, साफसफाईदेखील केली जात नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही तसेच अंगणवाडी नाही, परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नागरी वसाहत थाटलेली असली तरी प्रशासनाकडून कोणत्याही सुख-सुविधा पुरविला जात नसल्याने म्हसोबावाडीतील नागरिकांना आजही पथदीप, रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा मिळविण्यासाठी अजून किती दिवस वाट बघावी लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला.महिलांची पाण्यासाठी हातपंपावर झुंबडम्हसोबावाडीत जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नसल्याने नागरिकांना आजही खडतर मार्गानेच ये-जा करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना रस्त्याची प्रतीक्षा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. परिसरात महिलांना हातपंपावर पाणी भरावे लागते. पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडत असल्याने अनेकदा पिण्याच्या पाण्यावरून महिलांमध्ये वादविवाद होत असतात. परिसरात राहणाºया नागरिकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक