शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसमाळमध्ये गावकऱ्यांनी केले पाण्याचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:18 IST

पेठ : तीव्र दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ गावात सामाजिक संघटनेच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात पाणी पोहोचल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत तर महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन नृत्य करत जल्लोषात स्वागत केले.

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव मागील वर्षी दुष्काळासाठी देशभरात चर्चेत आले होते. समाजमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचून सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर दीड वर्ष एसएनएफ टीमच्या अथक परिश्रमातून म्हैसमाळ गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यात यश आले आणि गुरुवारी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरिक्षक राजेश लोखंडे, भूगर्भशास्रज्ञ डॉ. जयदीप निकम, प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, प्रशांत बच्छाव, महेश टोपले, देवदत्त चौधरी, जयदीप गायकवाड, देवीदास कामडी, मनोहर जाधव, दिलीप महाले, यशवंतराव धूम, संदीप डगळे आदी उपस्थित होते.पाण्यामुळे सुटणार सामाजिक प्रश्नएसएनएफच्या पाण्याच्या बदल्यात वृक्षसंवर्धन या योनजेंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले. या रोपांची निगा राखणे ते वाढविण्याची जबादारी गावकऱ्यांनी आनंदाने स्वीकारली. यासोबतच गावात पाणी आल्याने गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्पही गावकऱ्यांनी केला. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले, की पाण्याच्या अभावामुळे आमच्या गावातील मुलांशी लग्न करायला मुली तयार होत नव्हत्या. गेल्या काही दिवसांत सुटलेल्या पाणीप्रश्नामुळे आता तरुणांची लग्नेही व्हायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी