शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महानगर विकास प्राधीकरण विनापरवानगी बांधकामे नियमीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:32 IST

नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधीकरणाअंतर्गत विना परवानगी बांधण्यात आलेली बांधकामे तडजोड शुल्क भरून नियमीत करता येणार आहेत. अशी माहिती प्राधीकरणाच्या नियोजनकार सुलेखा वैजापुरकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देअनिवासी बांधकामांना दहा टक्के इतके तडजोड शुल्क आकारले जाणार आहे.

नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधीकरणाअंतर्गत विना परवानगी बांधण्यात आलेली बांधकामे तडजोड शुल्क भरून नियमीत करता येणार आहेत. अशी माहिती प्राधीकरणाच्या नियोजनकार सुलेखा वैजापुरकर यांनी दिली आहे. शासनाच्या नगररचना अधिनियमाअंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार नियोजन प्राधीकरणाची कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या बांधकामांना चालू बाजारमुल्य दर तक्त्यातील बांधकाम खर्चाच्या साडे सात टक्के तसेच अनिवासी बांधकामांना दहा टक्के इतके तडजोड शुल्क आकारले जाणार आहे.महाराष्ट्र प्रादेशिक नियोजनाच्या व नगररचना अधिनियमानुसार ही तरतूद करण्यात आली आहे. जी बांधकामे बाधीत होत नाही. तसेच प्रचलीत नियमावलीनुसार जी अनधिकृत बांधकामे नियमीत करता येऊ शकतात. त्यांनाच तडजोड शुल्क आकारून नियमीत करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधीत जमीन मालकांना आणि व्यवसायिकांना नाशिक महानगर विकास प्राधीकरणाकडे महाराष्ट्र जमिन महसुल संहिता १९६५ नुसार परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.अशाप्रकारचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राधीकरणामार्फत कोणत्याही शासकिय योजनांच्या प्रस्ताव, रस्ते किंवा सार्वजनिक प्रकल्पांनी बाधीत होत नाही याची खात्री करण्यात येणार आहे. प्रचलीत नियमावलीत बांधकाम नियमीत करणेशक्य असल्यासच मंजुरीची पुढिल कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैजापुरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी