शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
5
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
6
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
7
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
8
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
9
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
10
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
11
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
12
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
13
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
14
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
15
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
16
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
17
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
18
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
19
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
20
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
Daily Top 2Weekly Top 5

विवाह मंडपातून समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:04 IST

विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.

नाशिक : विवाह समारंभ म्हटला की अत्यंत अफलातून प्रयोग व संकल्पना पाहावयास मिळतात; मात्र काही संकल्पना या समाजाच्या भल्यासाठी राबविल्या जातात. विवाह सोहळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्याकडे समाजप्रबोधनाची संधी म्हणून पाहत एका नाशिककर कुटुंबाने समाजप्रबोधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने हा विवाह चर्चेचा ठरला.  नवनाथपंथी सामाजिक बहुद्देशीय संस्था व कानडे-शिंदे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव चेतन कानडे यांचा विवाह नुकताच शहरात पार पडला. त्यांचा हा विवाह चर्चेत आला तो केवळ समाजप्रबोधनाच्या संकल्पनेमुळे. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांचे टॉवेल-टोपी नव्हे, तर चक्क कापडी पिशवी आणि तुळस, अमृतवृक्ष कडुनिंबाची रोपे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागत कक्षाजवळ दोन्ही परिवारांच्या नावांचा स्वागत फलक नव्हे तर चक्क सुरक्षित वाहतूक व रस्ता सुरक्षेविषयीचे प्रबोधन करणारा ‘स्टॅन्डी’ पाहुण्यांच्या नजरेस पडत होता. तसेच ‘स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर’, ‘वृक्ष संवर्धन, काळाची गरज’, ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे प्रबोधनात्मक वाक्य लिहिलेल्या सचित्र फलकांनी आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.  प्लॅस्टिक वापराचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम दाखविणाºया फलकासोबत अनेकांनी ‘सेल्फी’ही घेतली.  लग्नपत्रिका घरोघरी जाऊन वाटपाची प्रथाही या कुटुंबाने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास सकारात्मक बदल घडून येतो; मात्र त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. या कुटुंबाने पारंपरिक विवाह सोहळ्यात अशाच प्रकारे बदल घडवत समाजप्रबोधनावर भर दिला. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून नव्हे तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत ‘स्मार्ट’ पद्धतीने दिले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांद्वारे तसेच भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत अगत्याचे निमंत्रण आपल्या मित्र-परिवाराला दिले.‘अक्षता’  फेकू नका...विवाह सोहळ्यात ‘अक्षता फेकू नका, तर त्या अक्षता दानपात्रात टाका’ अक्षतेच्या रूपाने वाया जाणाºया धान्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे एकवेळचे जेवण सहज होऊ शकते, असा सामाजिक संदेशही त्यांनी यावेळी मंडपातून दिला. या विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी वधू-वरांवर आलेल्या वºहाडी मंडळींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक