नाशिक : माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींबरोबरच सोमवारी गणरायाला निरोप भावपूर्ण निरोप देण्यात आला. गौरीच्या पाठवणीनंतर गोदावरीत गणरायाचे विर्सजन करण्यात आले. गेल्या गुरुवारी विघ्नहर्त्या गणरायाची घरोघर प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर शनिवारी गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले. गेल्या पाच दिवसांपासून सर्वच घरांमध्ये वातावरण बदलून गेले होते. अनेक कुटुंबांमध्ये गौरींना निरोप देतानाच गणरायालाही निरोप देण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी शहरातील नदीकाठी गणरायाला निरोप देण्यात आला. आनंदवली, रामवाडी पूल, तसेच गोदाकाठी अनेक ठिकाणी गणेशमूर्तीची आरती आणि अन्य पूजा करण्यात आली. त्यानंतर विधिवत विसर्जन करण्यात आले.
गौरींबरोबरच गणरायालाही निरोप
By admin | Updated: September 21, 2015 23:57 IST