शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

नाशिककर गारठले : तपमानाचा पारा ११.६ अंशापर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:04 IST

मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती.

ठळक मुद्देमंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान १३ नोव्हेंबर रोजी ११.५ इतके किमान तपमान

नाशिक : शहराचा पारा अचानकपणे घसरला असून वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना सोमवारी (दि.२७) रात्रीपासून हुडहुडी भरली आहे. मंगळवारी पहाटेदेखील कडाक्याची थंडी नाशिकरांनी अनुभवली. ११.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद हवामान केंद्राकडून मंगळवारी करण्यात आली होती. आज बुधवारी (दि.२८) ११.६ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले.आठवडाभरापासून थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा रविवारी १३ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे संध्याकाळी व पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीची तीव्रताही सोमवारी रात्रीपासून अचानकपणे वाढली. मंगळवारी ११.२ इतके नीचांकी तपमान या हंगामातील नोंदविले गेले. पंधरवड्यापूर्वी ११.८ अंशांपर्यंत पारा घसरला होता. त्यानंतर पुन्हा किमान तपमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती. आठवडाभरापूर्वी किमान तपमानाचा पारा १९ अंशांपर्यंत वर सरकल्याने नाशिककरांचे पंखे दिवसा-रात्री वेगाने फिरू लागले होते. वातानुकूलित यंत्रांचाही वापर नागरिकांकडून केला जाऊ लागला होता. कारण उष्मा जाणवत होता; मात्र पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती बदलली. सध्या दोन दिवसांपासून नाशिकरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला आहे.काही खासगी शाळांची सुटी संपल्यामुळे सकाळी चिमुकल्यांना शाळेत सोडताना पालकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा वापर केला जात आहे. लहानगेही संपूर्णत: ‘पॅक’ होऊन शाळेत जाताना दिसून येत आहे. दूधविक्रे ते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे. किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्योदयानंतर थंडीचा प्रभाव कमी होत असून सकाळी ८ वाजेनंतर थंडीची तीव्रता सुंपष्टात येत आहे; मात्र संध्याकाळी साडेसहा वाजेपासूनच थंडीचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे. १३ नोव्हेंबर रोजी ११.५ इतके किमान तपमान नोंदविले गेले होते.---प्रमुख शहरांमधील किमान तपमान असेरत्नागिरी : १९.७डहाणू : २१.२पुणे : १२.३अहमदनगर: १०.२नाशिक : ११.६मालेगाव : १३.८महाबळेश्वर : १५.२अकोला :१३.५गोंदिया ११.४

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान