शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारा चाळिशीपार नाशिक पुन्हा तापलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:13 IST

एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.

नाशिक : एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांचे नेतेही घामाघुम होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहराचे हवामान दमट झाले असून, शहराच्या वातावरणात उष्मा वाढला आहे. एप्रिलअखेर शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. प्रखर उन्हाची तीव्रता नागरिकांनी मंगळवारी अनुभवली. कमाल तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. किमान तापमान २०.३ अंश इतके नोंदविले गेले. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वातावरणात कमालीचा उष्मा आणि रात्री उकाडाही जाणवू लागला आहे.त्यामुळे दिवसाचा उष्मा आणि रात्रीचा उकाडा नाशिककरांना असह्य होऊ लागला आहे. चालू महिन्यात १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या महिन्यात २८ तारखेला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. एकूणच मार्च महिन्यापासून नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. चालू महिनाअखेरही तापमानाने चाळिशी गाठल्याने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत पारा मार्च महिन्यातील तापमानाची नोंद मोडून काढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिल्लीच्या हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या पाच दिवसांत या राज्यांत उष्णतेचा कहर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस विशेष खबरदारी घेत उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यावर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण