शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पारा ११.४ अंशावर : नाशकात थंडीचा जोर वाढला; नागरिकांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 17:59 IST

नाशिक : शहरात या हंगामातील नीचांकी ११.४ अंश इतक्या तापमानाची नोंद शनिवारी (दि.२८) झाली. शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे ...

ठळक मुद्देशनिवारी पारा अधिकच घसरलला.उबदार कपडे खरेदी करताना महागाईचा ‘झळ’ ११.४ अंश हंगामातील नीचांकी तापमान

नाशिक : शहरात या हंगामातील नीचांकी ११.४ अंश इतक्या तापमानाची नोंद शनिवारी (दि.२८) झाली. शहरात शुक्रवारी सकाळपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने शनिवारी पारा अधिकच घसरलला. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.मागील तीन दिवसांपासून शहराचे किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते; मात्र शुक्रवारी पारा १४ अंशावर आला. शनिवारी थेट तीन अंशांनी पारा घसरला आणि नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली. या हंगामात अद्याप १२.२ अंशापर्यंत तापमान खाली आले होते. मात्र शनिवारी ११.४ अंश ही सर्वात कमी नोंद झाली. निफाड तालुका सर्वाधिक गारठला आहे. तसेच मालेगाव तालुक्यातही थंडीचा जोर वाढल्याचे दिसून येते. तेथेही ११.६अंश किमान तापमानाची नोंद झाली. नाशिककरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. निफाडला आठवडाभरापुर्वी १० अंशापर्यंत तापमान खाली आले होते.शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे नाशिककर उबदार कपड्यांचा वापरास प्राधान्य देताना दिसून येत आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढल्याबरोबरच भावदेखील वधारल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना उबदार कपडे खरेदी करताना महागाईचा ‘झळ’ बसू लागली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वच प्रकारचे उबदार कपडे महाग झाले आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी पहाटे व सकाळी थंडीपासून बचाव करताना दिसून आले. शनिवारी अचानकपणे पारा घसरल्याने चाकरमान्यांनी दिवसभर स्वेटर, हाफ जॅकेट परिधान करून कार्यालयात दैनंदिन कामकाज आटोपले. शहरासह जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास धुके पहावयास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात तसेच शहराजवळील खेड्यांमध्ये गोदाकाठावर शेकोट्यापासून उब मिळविण्याचा प्रयत्न रहिवाशांकडून केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान