देवळा : दोन आठवड्यापासून देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान कांदा व्यापाऱ्यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली असून यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे. पूर्वीचीच लिलाव पद्धत व्यापाऱ्यांनी सुरु करावी, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.यापुढे आडत ही कांदा खरेदीदाराकडूनच वसुली केली जाणार असली तरी व्यापाऱ्यांनी गोणीपद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने निवड करुन गोणीत भरुन आणावा लागणार आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत झाला असून व्यापाऱ्यांनी हे अडवणूकीचे धोरण अवलंबल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा गोणीत भरुन आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतकऱ्यांकडून आडत घेतली जाणार नाही अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे तर शेतकऱ्यांचा ह्या गोणी पद्धतीला विरोध असल्याने सोमवारी दि. २५ रोजी देवळा येथे कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही. निफाड - शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणताना कांदा गोणीत भरुन आणावा या चुकीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सायखेडा मार्केट मध्ये बाजार समितीचे संचालक, व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी यांची संयुक्त बैठक सायखेडा येथे संपन्न झाली. या बैठकीत पिंपळगाव बाजार समिती संचालक गोकुळ गिते यांनी शेतकरी अन व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीची भूमिका बाजार समिती करत असुन सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी भरडला जात आहे. सायखेडा व्यापारी असोसिएसनचे अध्यक्ष सुरेश कमानकर यांनी आम्हाला अडत बंद झाल्याने कांदा खरेदी परवडत नाही तर शेतकरी प्रभाकर रायते यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गोणीत कांदा विक्र ी करणे परवडनारे नसून उलट अडतीपेक्षा जादा खर्च येतो त्यामुळे गोणीने विक्र ी करणे शेतकऱ्यांना परवडनारे नसून उलट खर्च वाढणार आहे. बाजार समिती संचालक विजय कारे यांनी बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा सध्या पडून असुन सडत आहे . त्यामुळे लवकरात लवकर निर्णय होने गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. अश्पाक शेख यांनी १५ दिवसांपासून मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांबरोबरच मार्केटवर अवलंबून असणाऱ्या घटकांवर संकट कोसळले आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मरण होत आहे. असे मत यावेळी व्यक्त केले येत्या शुक्र वारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीत गोणीत कांदा लिलावासाठी आणण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात यावेळी अश्पाक शेख, विजय कारे, गोकुळ गिते, सुरेश कमानकर, प्रभाकर रायते, नारायण वरखेडे, दत्तात्रय खालकर आदी सह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
व्यापाऱ्यांचा संप मागे : व्यापाऱ्याकडून अडवणूक होत असल्याची भावना
By admin | Updated: July 25, 2016 23:39 IST