सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव प्रवीण परदेशी, राजेंद्र पवार, डॉ. संजय बेलसरे, जे.व्ही.आर. मूर्ती, सुनील पोटे, पद्मभूषण देशपांडे उपस्थित होते. सततचा दुष्काळ व पाण्याचा तुटवडा असणाऱ्या औरंगाबाद जिल्हातील वैजापूर, गंगापूर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये शेतीच्या सिंचनाची गरज भागविण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणामधून २००४ साली १२५ कि.मी.चे पाटाचे जाळे तयार करण्यात आले.जलसंपदा विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व युवामित्र संस्थेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतून उपक्रम राबविण्यात येणार असून, उपक्रमाद्वारे, पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी १२३ पाणीवापर संस्थांची क्षमता बांधणी करणे, धरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश साध्य केले जाणार आहेत. सदर कार्यक्रमाद्वारे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील ३ तालुके व १०४ गावांमधील ५५ हजार कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा होणार असून, सुमारे १.०८ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविल्या जाणाºया या प्रकल्पांतर्गत शासकीय यंत्रणा, लाभक्षेत्रातील शेतकरी, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट - देणगीदार संस्था यांचा सहभाग मिळणार आहे.
नांदूरमधमेश्वर कालवा विकासासाठी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST
सिन्नर : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्ट्र राज्य व युवामित्र संस्था, सिन्नर यांच्या दरम्यान नांदूरमधमेश्वर एक्स्प्रेस कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आणि उत्पादकता वाढविण्याबरोबरच एकात्मिक शेतीविषयक गुंतवणूक आणि बाजारपेठेशी जोडणी करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याकरिता सामंजस्य करार कार्यक्रम नुकताच मंत्रालयामध्ये पार पडला.
नांदूरमधमेश्वर कालवा विकासासाठी सामंजस्य करार
ठळक मुद्देधरण लाभक्षेत्रातील ५००० एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचना खाली आणण इत्यादी उद्देश