नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त एकमताने मंजूर झाल्याने पदच्युत कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या सर्वसाधारण सभेत संबंधित पदाधिकाऱ्यांकडून वाचनालयाचे नूतनीकरण करताना करासहीत दाखविण्यात आलेला सुमारे १७ लाखांचा अतिरिक्त खर्च वसूल करून त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली.
‘त्या’ तीन पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व अखेर रद्द
By admin | Updated: March 6, 2017 01:43 IST